भारतीय महिला हॉकी संघाचा विजय   

नवी दिल्ली : कनिष्ट भारतीय महिला हॉकी संघाने रुग्वे संघाचा ३-१ असा पेनल्टी शुटमध्ये पराभव केला.  हा सामना अर्जेंटिनामधील रोसारिओ शहरात खेळविण्यात आला.या सामन्यात भारतीय हॉकी संघाची उप कर्णधार हिना हिने १० व्या मीनिटाला गोल केला. तर लारिनपुई हिने २४ व्या मीनिटाला दुसरा गोल केला. त्यानंतर गीता, कनिका आणि लालथनलुआगी यांनी शानदार कामगिरी करत सामना भारताला जिंकवून दिला.
 
भारतीय मुलींच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतूक केले जात आहे. या सामन्याच्या अर्ध सत्राच्या आधी भारतीय संघ २-० असा आघाडीवर होता. त्यानंतर भारतीय संघाने आघाडी सोडली नाही. आणि सामन्यावर वर्चस्व मिळविले. 

Related Articles